मुंबई: राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळं आघाडी तुटली असा आरोप होणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपांना रोखठोक उत्तर दिलंय. आम्ही १४४ जागांवर अडून बसलो नाही, असं स्पष्टीकरण दादांनी दिलं. झी मीडियाच्या रोखठोक कार्यक्रमात ते बोलत होते.
काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे असून ते दिल्लीतून ज्या खूर्चीच्या ओढीनं राज्यात आले, त्यांना कोणती महत्त्वाकांक्षा होती? असं थेट उत्तर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. राज्यात जे पवारांचा विरोध करतात, त्यांना दिल्लीत जवळ केलं जातं, या शब्दात अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली.
एवढंच नव्हे तर पाच वर्ष, मुख्यमंत्र्यांनी काम केलं नाही. फाइल्स अडवून ठेवल्या, क्लिअर केल्या नाही, मग लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वीच दोन-दोन दिवस कॅबिनेट घेऊन हजारोंनी फाइल्स क्लिअर केल्या, याला काय म्हणायचं, असंही अजित पवार म्हणाले. तसंच वैयक्तिक हितसंबंधांसाठी जर मी फाइल क्लिअर करायला सांगितली असेल तर राजकारण सोडून देईन, असं थेट आव्हान दादांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.