विदर्भात भाजपचाच 'गड', फडणवीस होणार मुख्यमंत्री?

विदर्भ भाजपसाठी 'गड' ठरलाय. विधानसभेच्या ६२ जागांपैकी तब्बल ४३ जागा भाजपनं जिंकल्या आहेत.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून ४८०४६ मतांनी विजय मिळवलाय.

Updated: Oct 19, 2014, 04:38 PM IST
विदर्भात भाजपचाच 'गड', फडणवीस होणार मुख्यमंत्री? title=

नागपूर: विदर्भ भाजपसाठी 'गड' ठरलाय. विधानसभेच्या ६२ जागांपैकी तब्बल ४३ जागा भाजपनं जिंकल्या आहेत.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून ४८०४६ मतांनी विजय मिळवलाय.

विदर्भात काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागलाय. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नितीन राऊत यांचा पराभव झालाय. तर सतीश चतुर्वेदी, अनिल देशमुख यांनाही आपला गड राखता आला नाहीय.

यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा मुलगा राहुल ठाकरे याचं डिपॉझिट जप्त झालंय. आपला पराभव स्वीकारत माणिकराव ठाकरेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा सोनिया गांधींकडे पाठवलाय.

बडनेराहून अपक्ष उमेदवार रवी राणा यांनी आपली आमदारकी कायम ठेवलीय.
एकूणच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यावेळी विदर्भाला मिळण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.