खळबळजनक, गुजरातचे हजारो बोगस मतदार मुंबईत!

 राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदान पार पडल्यानंतर गुजरातची हजारो बनावट पॅनकार्डस् भाईंदरच्या राई गावातील खाडी पुलाजवळ फेकून दिल्याचे आढळून आले आहे. त्यावरून मुंबईतील मतदानासाठी हजारो बोगस मतदार गुजरातमधून आणण्यात आल्याचा संशय बळावला आहे.

Updated: Oct 17, 2014, 01:33 PM IST
खळबळजनक, गुजरातचे हजारो बोगस मतदार मुंबईत! title=

भाईंदरच्या खाडीत सापडली बनावट पॅनकार्डस्

भाईंदर :  राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदान पार पडल्यानंतर गुजरातची हजारो बनावट पॅनकार्डस् भाईंदरच्या राई गावातील खाडी पुलाजवळ फेकून दिल्याचे आढळून आले आहे. त्यावरून मुंबईतील मतदानासाठी हजारो बोगस मतदार गुजरातमधून आणण्यात आल्याचा संशय बळावला आहे.

भाईंदरच्या खाडीत सापडलेल्या प्रत्येक बनावट पॅनकार्डला एक चिठ्ठी जोडलेली होती. त्यावर मतदाराचे नाव, नंबर आणि मतदान केंद्राचा उल्लेख आहे. पण पॅनकार्डावरील नावे आणि पत्ते गुजरातमधले असल्याचे दिसून येते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदानाचा ‘टक्का’ वाढवण्यासाठी गुजरातमधून बोगस मतदार मोठ्या प्रमाणात आणण्यात आले होते हे स्पष्ट झाले आहे.

गुजरातमधील वलसाड, नवसारी येथील पत्ते असणारे मतदार ओळखपत्र, आधारकार्डांच्या फोटोकॉपीज या वेळी मिळाल्या.  विशेष म्हणजे फोटोकॉपीखाली मीरा-भाईंदर मतदारसंघातील मतदारांचे नाव आणि अनुक्रमांक लिहिलेले होते.

अनेक पॅनकार्ड बनावट, तर काही खरी वाटत होती. पॅनकार्डसोबत रबरने मतदार आणि मतदान केंद्र क्रमांक असलेली स्लीप जोडलेली होती. राई खाडी पुलावरून जाणाऱ्या ग्रामस्थांना पुलाखालील मोकळ्या जमिनीवर काहीतरी कागदपत्रे पडल्याचे दिसले. त्यानतंर त्यांनी पत्रकारांना बोलावून ही सारी बोगस कागदपत्रे भाईंदर पोलिसांकडे दिली.

काही पॅनकार्ड आणि कागदपत्रे खाडीत तरंगत होती, त्याकडे पोलिसांनी मात्र दुर्लक्ष केले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.