नाशिक : कळवण मतदार संघातील एका उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. हरि पवार यांचा अर्ज बाद झाल्यानंतर, हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
हरि पवार यांचा अर्ज बाद होण्याचं कारण अजून समजू शकलेलं नाही. हरि पवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. कळवण हा आदिवासी मतदार संघ आहे. अर्ज छाननीनंतर त्यांचा अर्ज बाद झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं.
निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरतांना यावेळी देखिल मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. मात्र नेमके काय बदल आणि आवश्यक बाबी आहेत, याची माहिती उमेदवारांनी करून घेणे महत्वाचे आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.