इंदापूर: पुणे-सोलापूर महामार्गावरती मौजे पळसदेव गावच्या हद्दीतील काळेवाडी इथं अचारसंहिता भरारी पथकानं पाच कोटी रुपये पकडले. एका कारमधून सात पोत्यांमध्ये असलेली पाच कोटींची रक्कम पाहून अधिकारीही चक्रावले.
पुणे-सोलापूर महामार्गावर अचारसंहिता भरारी पथक क्र. २ चे प्रमुख आर. एन. गवंड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका चारचाकीमध्ये नोटांची सात पोती आढळून आली.
पथक प्रमुख गवंड इंदापूर निवडणूक अचारसंहिचा कक्ष प्रमुख डॉ. एल. बी. वडापुरे, के. मोरे, के. आर. दराडे, यांना तातडीनं महिती दिली. सदरची रक्कम सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची असल्याची शक्यता असून बँकेचे शाखाधिकारी आणि इन्कमटॅक्स अधिकारी यांना शहनिशा करण्यासाठी इंदापूरला बोलावलं असल्याची माहिती इंदापूर विधानसभा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली.
५० हजारोंपेक्षा जास्त रक्कम बाळगू नका
प्रवास करताना सर्वसामान्य नागरिकांनी ५० हजार रुपयांपेक्षा जादा रक्कमेची ने-आणू करू नये, जवळ बाळगू नये, तसंच जास्त रक्कम असेल तर त्याबद्दलचे पुरावे बरोबर ठेवावेत, असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी आरती भोसले यांनी केलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.