मुंबई : भाजपचे उमेदवार राम कदम यांच्या विरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम कदम यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
राम कदम यांनी घाटकोपर येथील असल्फा या ठिकाणचं कार्यालय निवडणूक कामकाजासाठी तसेच प्रचारासाठी वापरल्याचं निवडणूक आयोगाच्या सर्व्हिलंस टीमच्या निदर्शनास आलं. तसेच हे कार्यालय उभारताना मूळ जमीन मलकाची परवानगी देखिल घेण्यात आली नसल्याचं सांगण्यात येत आहे.
या अनुषंगाने राम कदम यांच्यावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून घाटकोपर पोलिस ठाण्यात कलम 324/14 आयपीसी 420 , 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.