बीड : शिवरायांचा आशीर्वाद मागणारे सभेत छत्रपतींचा पुतळाही ठेवत नाही, असं म्हणत बीडच्या सभेवरून उद्धव ठाकरेंनी उडवली मोदींची खिल्ली उडवलीय.
बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर होणाऱ्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपचे मार्ग वेगळे झालेत. नुकतीच, मुंडे यांच्या या बालेकिल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला प्रचंड प्रतिसादही मिळाला होता. गोपीनाथ मुंडे असते तर, मला महाराष्ट्रात विधानसभेच्या प्रचाराला येण्याची गरजच लागली नसती, अशी भावनिक सादही यावेळी मोदींनी बीडच्या जनतेला घातली होती.
तसंच ‘ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे...’ असं म्हणत मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला भाजपला बहुमत देण्याचं आवाहन केलं होतं. यावरूनच उद्धव ठाकरेंनी बीडच्या सभेवरून नरेंद्र मोदींची खिल्ली उडवलीय. शिवरायांचा आशीर्वाद मागतात मात्र सभेच्या ठिकाणी शिवरायांचा पुतळा ठेवत नाहीत असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.