मुंबई : वरळी कोळीवाड्यात सुधाकर घागरे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत दोन ट्रक भरुन फ्राय पॅन जप्त करण्यात आलेत. यावेळी दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन अहिर आणि त्यांच्या पत्नी संगीता अहिर उपस्थित होत्या असा आरोप होत आहे.
सुधाकर घागरे हे ना.म.जोशी मार्गाचे माजी सिनीयर पीआय असून अहिर यांनी त्यांची कोळीवाड्यातील प्रचारप्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचं बोललं जात आहे. कोळीवाड्यात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळं हा आचारसंहिता भंगाचा प्रकार असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. त्यानंतर निवडणूक भरारी पथक आणि दादर पोलिसांनी कारवाई करत दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय.
हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी हा प्रकार निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या कानावर घातला. यावेळी कारवाई करताना पोलिसांना साधारण ४ ते ५ लाखांचा मुद्देमाल सापडलाय. पोलिसांची कारवाई अजून सुरुच आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.