मुंबई: शिवसेनेचा २०१६ मध्ये सुवर्णमहोत्सव आहे. या महोत्सव विशेष करण्यासाठी राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असले आणि तोपर्यंत राज्यातील किमान ५० योजना शिवसेनेच्या सरकरानं पूर्ण केलेल्या असतील, अशी घोषणा आज उद्धव ठाकरेंनी केली.
उद्धव ठाकरे आज महत्त्वाची घोषणा करणार अशी जाहिरात करण्यात आली होती. हीच 'ती' महत्वाची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत केली. भाजपशी या निवडणुकीत युती केली असती तर शिवसेना संपली असती, असा हल्लाबोलही उद्धव यांनी केला. सभेचा शेवट करताना उद्धव आणि आदित्य यांनी जनसमुदायासमोर नतमस्तक होत 'तुमच्या प्रेमाचा मी कधीही उतराई होऊ शकत नाही', अशा भावना व्यक्त केल्या.
बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणारा. पुढच्या दोन वर्षात उद्याचा महाराष्ट्र कसा असेल हे मी दाखवून देईन. माझी लढाई महाराष्ट्रासाठी आहे. तुम्ही मला प्रेम द्या, तुमचा विश्वसघात होणार नाही याची हमी मी देतो', अशी सादही उद्धव यांनी महाराष्ट्रातील जनतेला यावेळी घातली.
मोदींच्या सभेला गुजरामधून माणसे आणली!
उद्धव यांच्या भाषणात मोदी आणि भाजपच मुख्य लक्ष्य होतं. सुरुवातीलाच त्यांनी मोदींच्या बोरिवलीतील सभेला गुजरातमधून बसेस भरभरून माणसे आणली गेल्याचा आरोप केला. आजपर्यंत आमचं प्रेम अनुभवलंत आता शिवसेनेच्या अंगाराची धग सोसा, असा इशाराही उद्धव यांनी भाजपला दिला.
उद्धव ठाकरे बीकेसीच्या भाषणातील मुद्दे
-
संपूर्ण महाराष्ट्र भगवा झालाय... बाकी लोकं येतायेत बडी-बडी माणसं येतायेत...
-
सुरूवातीलाच मोदींवर हल्लाबोल
-
राज-उद्धव भाषण सुरू... आल्या-आल्या मोदींवर उद्धव ठाकरेंचा हल्ला...
-
इथं आलेले लोक मुंबईकर आहेत... बाहेरून दुसऱ्या राज्यातून आलेले नाहीत...
-
भाजपच्या सभेला गुजरातमधून बसेस भरून आल्या, उद्धव ठाकरेंचा आरोप
-
शिवसेनेच्या सभेला मुंबईकर एकवटले
-
'आतापर्यंत प्रेम अनुभवलं, आता धग सोसा'- उद्धव ठाकरे
-
ही शिवसेनेची गर्मी आहे...टेम्पोवर बसून २०० लोकांसमोर भाषण केलं...
-
भाजपच्या मंत्रिमंडळांवर टीका
-
म्हणाले लोकसभेनं सदरा दिला, तुम्ही पायजामा द्या...
-
पण तुम्हीच तुमचा पायजामा उतरवला...
-
शिवसेनाप्रमुख असते तर युती तुटलीच नसती, कारण तुमची हिंमत असती का?
-
ते ऋणानुबंधाचे संबंध होते
-
ज्यांनी माझ्यावर टीका केली, त्यांना अजून मी उत्तर दिलं नाहीय..
-
अटलजी असते तरी युती तुटली नसती... कदम मिलाकर चलना होगा... ही त्यांची कविता होती..
-
प्रत्येक अडचणींच्यावेळी, संकटांना बाळासाहेबांनी साथ दिली
-
इथं ही गर्दी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे
-
मी कोणीही नाही, इथं बाळासाहेब आहेत- उद्धव
-
अजित पवारांना मुख्यमंत्री करतो, फक्त एकच अट...
-
कोणीही अजित पवारांच्या घरी जावं आणि एक ग्लास पाणी पिऊन यावं...
-
बुडत्या जहाजाचे कॅप्टन पृथ्वीराज चव्हाण
-
मि. क्लीन म्हणता, मग साबणाची जाहिरात करा
-
पंतप्रधान बोलतात महाराष्ट्राचे तुकडे होऊन देणार नाही,
-
मग लगेच १५ मिनिटांत प्रदेशाध्यक्ष म्हणतात आम्ही वेगळा विदर्भ करणारच
-
मी सत्तेत आल्यावर कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र परत आणणार
-
शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटचे मुद्दे भाजपच्या दृष्टीपत्रात
-
सर्व्हेवर माझा विश्वास नाही, माझा शिवसैनिकांवर विश्वास
-
राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बलात्काराचे गुन्हे दाखल होत असताना पृथ्वीराज चव्हाण गप्प का होते
-
वाचा आणि पेटून उठा...
-
शिवसेनेवर संकट नाही... ही संधी!
-
शिवसेनेच्या स्थापनेला २०१६मध्ये ५० वर्ष होतायेत
-
शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर शिवसेनेला ५० वर्ष होतील तोपर्यंत...
-
राज्यासाठीच्या ५० योजना पूर्ण केल्या असतील...
-
२ वर्षात करून दाखविल... पुढच्या ५० वर्षात महाराष्ट्र कसा असेल ते...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.