मुंबई : राजकारणात कधी काय होईल. याची श्वासती नसते. दादरमध्ये आज हेच दिसून आले. शिवसेना नेते मनोहर जोशी आणि सदा सरवणकर यांचं हाडवैर सर्वांनाच माहित आहे.
परंतू मधल्या काळात ब-याच राजकीय घडामोडी घडल्या आणि माहिममधील शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकरांना निवडणूक कार्यालयाच्या उद्धाटनासाठी मनोहर जोशींना बोलवावे लागले.
यावेळी सरवणकरांनी सरांचा आशीर्वादही घेतला. पाच वर्षापूर्वी मनोहर जोशींच्या घरावर चाल करून गेलेले कार्यकर्ते हे सदा सरवणकर यांचेच आणि वर्षाभरापूर्वी दसरा मेळाव्यात स्टेजवर आलेल्या मनोहर जोशींविरोधात घोषणा देणारे कार्यकर्तेही सरवणकरांचे असल्याची चर्चा होती.
मात्र हे आताचे हे छित्र पाहून राजकारणात कुणीही कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.