बाळासाहेबांनंतर उद्धवने शिवसेना समर्थपणे सांभाळली - भुजबळ

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेना संपेल असं, मी कधीच म्हटलं नाही... उद्धव ठाकरेंमध्ये मॅनेजमेंटचे उत्तम गूण असून बाळासाहेबांनंतर उद्धवनं शिवसेना अतिशय आत्मविश्वासानं आणि समर्थपणे सांभाळली असल्याचं रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे माजी नेते छगन भुजबळ यांनी मांडलंय. 

Updated: Oct 3, 2014, 07:41 PM IST
बाळासाहेबांनंतर उद्धवने शिवसेना समर्थपणे सांभाळली - भुजबळ title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेना संपेल असं, मी कधीच म्हटलं नाही... उद्धव ठाकरेंमध्ये मॅनेजमेंटचे उत्तम गूण असून बाळासाहेबांनंतर उद्धवनं शिवसेना अतिशय आत्मविश्वासानं आणि समर्थपणे सांभाळली असल्याचं रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे माजी नेते छगन भुजबळ यांनी मांडलंय. 

शिवसेनेला चांगले दिवस आहेत, अशी माहिती भुजबळ यांनी दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. उद्धव ठाकरे चांगला पक्ष चालविला आहे. एवढ्या मोठ्या पक्षाला चालविणे तेवढे शक्य नाही. ते जास्त मेहनत घेत आहेत. बाळासाहेबानंतर ते अधिक मेहनत घेत आहेत. त्यांना चांगले यश मिळले, असे भुजबळ म्हणालेत.

दोन भाऊ एकत्र यावेत का, असे विचारले असता ते म्हणालेत तसे वाटते. मात्र, तो त्यांचा प्रश्न आहे. मी अधिक काहीही बोलणार नाही. मी काही सांगितले तर उद्या म्हटले जाईल, तुम्ही आम्हाल सल्ला देणार कोण? तेव्हा याबाबत गप्प राहिले बरे.

दरम्यान, राज्यात नरेंद्र मोदी यांची काहीही लाट नाही. सातत्याने मीडियातून मोदी लाट, मोदी लाट हे दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकांच्या मनावर ते बिंबवले गेले. लोकसभेसारखी आता परिस्थिती नाही, असंही भुजबळ म्हणाले. 

सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस गरज पडल्यास काँग्रेससोबतच जावू, पण मुख्यमंत्री बदलवून मागू... राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा असेल तर शरद पवार मुख्यमंत्री होतील, असंही भुजबळ म्हणाले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.