विदर्भात मतदान केंद्रावर वीज कोसळून पोलीस कर्मचारी ठार, 8 जखमी

सावनेर इथल्या पारशिवनी आवडेघाटातील मतदान केंद्रावर वीज कोसळून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. काही वेळापूर्वी या मतदान केंद्रावर वीज कोसळून काही जण जखमी झाले होते, त्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

Updated: Oct 15, 2014, 01:15 PM IST
विदर्भात मतदान केंद्रावर वीज कोसळून पोलीस कर्मचारी ठार, 8 जखमी title=

सावनेर: सावनेर इथल्या पारशिवनी आवडेघाटातील मतदान केंद्रावर वीज कोसळून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. काही वेळापूर्वी या मतदान केंद्रावर वीज कोसळून काही जण जखमी झाले होते, त्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात मतदानाला सुरूवात झाली असली तरी विदर्भात मात्र मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं मतदानाला अल्प प्रतिसाद मिळतोय. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यू झाल्यानं आवडेघाटमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तर मतदानाच्या दिवशी विदर्भात मुसळधार पावसानंही हजेरी लावली आहे. त्यामुळं मतदारांची गोची झाली आहे.

राज्यभरातल्या 288 मतदारसंघांमध्ये मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्राला सजगतेची आणि लोकशाहीचं भान असण्याची परंपरा लाभली आहे. त्यामुळं या मतदान केंद्रांवर आज सकाळपासूनच हजेरी लावली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.