'हातात नाही आमदारकीचा 'पत्ता', तरीही मी नेता'

भाजपसोबत विधानसभा निवडणुकीत असलेल्या  घटकपक्षांची वाट लागली आहे, आरपीआयचा एक उमेदवार निवडून येऊ शकलेला नाही, तरीही आम्हाला दोन मंत्रीपदं द्या अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

Updated: Oct 21, 2014, 07:05 PM IST
'हातात नाही आमदारकीचा 'पत्ता', तरीही मी नेता' title=

मुंबई: भाजपसोबत विधानसभा निवडणुकीत असलेल्या  घटकपक्षांची वाट लागली आहे, आरपीआयचा एक उमेदवार निवडून येऊ शकलेला नाही, तरीही आम्हाला दोन मंत्रीपदं द्या अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

या निवडणुकीत रासपचा एक तर शिवसंग्रामचा एक उमेदवार निवडून आला आहे. स्वाभिमानी आणि आरपीआयला भोपळा मिळाला आहे, पण तरीही रामदास आठवले यांनी दोन मंत्रीपदांची मागणी केलीय.
 
रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली होती, उद्धव यांनी आपण रामदास आठवलेंना उपमुख्यमंत्रीपद देऊ या, असं म्हटलं होतं, पण उद्धव हेच मुख्यमंत्री होणार नाहीत, तर मला कुठून उपमुख्यमंत्री देणार असा सवाल एका सभेत रामदास आठवले यांनी केला होता.

मात्र रामदास आठवले यांच्या पक्षातील एकाही उमेदवाराला जर आमदारकी मिळाली नसेल तर यांना मंत्रिपद कुठून द्यायचं हा देखिल प्रश्न उपस्थित झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.