सांगली : मनसेच्या उमेदवारांला आमदार व्हायचे आहे, पण त्याला बलात्कार करायचा होता, तर निवडणुकीनंतर करायला हवा होता, अशी धक्कादायक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांनी केली आहे.
आर. आर. पाटील यांची वादग्रस्त क्लिप खासदार संजय काका पाटील यांनी दिली पत्रकारांना दिली आहे. कवठेएकंदच्या सभेत आर आर पाटिल यांच धक्कादायक वक्तव्य केले आहे. मनसेचा उमेदवार येथे उभा केला आहे. पण बलात्काराच्या आरोपाखाली तो अटकेत आहे. आमदारच व्हायच होत, तर किमान त्याने निवडणुक झाल्यावर बलात्कार करायला पाहिजे होत, असे आर. आर. पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य केले होते.
महिलांशी आणि महिलांच्या प्रतिष्ठेची विषयी अर्थ काढण्याची गरज नाही. महिलांचा अवमान करणे हा माझा उद्देश नव्हता. यात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया आर. आर. पाटील यांनी व्यक्त केली आहे. विरोधकांच्या आरोपांबद्दल उपरोधक टीका करत होतो, त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो असे पुन्हा आर. आर. पाटील यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले.
पाहा आर. आर. पाटील यांची ही धक्कादायक क्लिपिंग
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.