सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभेच्या निवडणुकीत देशाचा कारभार सोडून राज्यात २२ सभा घेत आहेत, यामुळे पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला त्यांनी तडा गेलाय, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय.
शरद पवार सोलापुरात प्रचार सभेत बोलत होते, यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपच्या भूमिकेवर सडकून टीका केली, राष्ट्रवादीत राहून भ्रष्टाचार करणाऱ्यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला, तर ते आज भाजपचे उमेदवार झालेत.
भाजपचीपोस्टर बाजी आणि जाहिरातींवर शरद पवारांनी कोपरखळ्या लगावल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.