'अखंड महाराष्ट्र ठेवणाऱ्यांनाच शिवछत्रपतींचा आशीर्वाद'

अखंड महाराष्ट्र ठेवणाऱ्यांनाच शिवछत्रपतींचा आशीर्वाद मिळेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. भाजपने 'शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ', अशी जाहिरात केली आहे.

Updated: Sep 30, 2014, 01:26 PM IST
'अखंड महाराष्ट्र ठेवणाऱ्यांनाच शिवछत्रपतींचा आशीर्वाद' title=

मुंबई : अखंड महाराष्ट्र ठेवणाऱ्यांनाच शिवछत्रपतींचा आशीर्वाद मिळेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. भाजपने 'शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ', अशी जाहिरात केली आहे.

स्वतंत्र विदर्भाचं सुतोवाच अनेक वेळा राज्यातील भाजप नेत्यांनी बोलून दाखवलं आहे, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावतांना म्हटलंय, अखंड महाराष्ट्र ठेवणाऱ्यांनाच शिवछत्रपती आशीर्वाद मिळेल.

शिवसेनेला अर्जुनाची साथ
आरपीआय नेते अर्जुन डांगळे हे शिवसेनेत दाखल झाले आहेत. अर्जुन डांगळे यांच्या रूपाने शिवसेनेला अर्जुन मदतीला आला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अर्जुन डांगळे यांना देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही, माझे हात रिकामे आहेत. मात्र मी अर्जुन डांगळे यांना विश्वास देऊ इच्छीतो. अर्जुन डांगळे यांनी शिवसेनेला योग्य वेळी दिलेली साथ मोलाची आहे. ही दिलेली साथ मी कधीही विसरणार नाही हाच माझा शब्द, कारण शब्द देतांना लाख वेळेस विचार कर, असं बाळासाहेबांनी मला वेळोवेळी सांगितल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.