परभणी : गंगाखेडमध्ये बॅगेच सापडेलल्या साडेचार लाख रूपयांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या पैशांच्या बाबतीत मला काही माहित नाही, हा पक्ष निधी असू शकतो, यावर आम्ही निवडणूक आयोग, गरज पडल्यास आयकर विभागाला स्पष्टीकरण देऊ, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
जिंतूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या गाडीतील बॅगेत साडेचार लाख रूपये पोलिसांना सापडले होते. हे अजित पवारांच्या पीएचे कपडे आणि पैशांची बॅग असल्याचं ड्रायव्हरने सांगितलं होतं.
याबाबतील पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर सामान लातूरला रवाना करण्यात आलं, मात्र कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, पोलिसांनी याबाबतीत उमेदवाराकडून अधिक माहिती घेतली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.