अफजलखान कोण?, मोदी की अमित शहा?, सुप्रिया सुळेंचा सवाल

शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांना नेमकं अफजलशहा कुणाला म्हणायचं आहे, नरेंद्र मोदी यांना की, अमित शहांना, हे त्यांनी जनतेला सांगावं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Updated: Oct 8, 2014, 10:04 PM IST
अफजलखान कोण?, मोदी की अमित शहा?, सुप्रिया सुळेंचा सवाल title=

जुन्नर : शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांना नेमकं अफजलशहा कुणाला म्हणायचं आहे, नरेंद्र मोदी यांना की, अमित शहांना, हे त्यांनी जनतेला सांगावं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं, दिल्लीतून अफझलखानाने महाराष्ट्रावर फौज पाठवली आहे, उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याविषयी सुप्रिया सुळे बोलत होत्या.

काँग्रेसने केलेल्या कामांची उद्घाटन नरेंद्र मोदी करत फिरत आहेत, नरेंद्र मोदी यांचं बारामतीत स्वागत आहे, पण अजितदादाचं लाखोंच्या मताधिक्क्यानं निवडून येतील अशी आशा सुप्रिया सुळे यांनी जुन्नरमध्ये व्यक्त केली.

महाराष्ट्र सर्वात पुढे आहे, आणि तो नरेंद्र मोदी यांच्यामुळे नाही हे मला जनतेला सांगायचं आहे, नितिन गडकरी त्यांच्या भाषणातून दारू पिण्याचे सल्ले देतात, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यावेळी पेपरमध्ये आलेली नितिन गडकरींची वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी वाचून दाखवली.

कोणत्याही राजकीय पक्षांना शरद पवारांशिवाय कुणीही दिसत नाही, उठसुट त्यांच्यावरच टिका करतात, अशी खंतही यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.