मुंबई : निवडणुकीपूर्वी एकत्र आले नाहीत मात्र आता निवडणुकीनंतर तरी दोघा ठाकरे बंधूनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं, असं आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलंय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांना एकत्र आणणं हाच आपला अजेंडा असल्याचं बाळा नांदगावकर यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय.
प्रचार आणि मतदानाची धामधूम संपल्यानं शिवडी मतदारसंघातले मनसेचे उमेदवार बाळा नांदगावर आज एकदम रिलॅक्स मूडमध्ये होते. ब-याच दिवसानंतर त्यांनी आपल्या फॅमिलीसह जेवण घेतलं, गप्पा मारल्या.
तर दुसरीकडं भाजपनं शिवसेनेला पुन्हा डिवचलंय. गेल्या पंचवीस वर्षांपासून छोटा भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण याचा वाद सुरू होता. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर कोण मोठा भाऊ हे ते कळेल, अशा शब्दात भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेला टोला लगावलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.