मोदींचा नामोल्लेख न करता उद्धव ठाकरेंची टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावरही टीका केली. ज्यांना बुरे दिन असताना साथ दिली, ते अच्छे दिन आल्यावर सोडून गेले. यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल उद्धव ठाकरेंनी आज बोरिवलीतील जाहीर सभेत बोलताना केला.

Updated: Oct 4, 2014, 07:27 AM IST
मोदींचा नामोल्लेख न करता उद्धव ठाकरेंची टीका title=

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावरही टीका केली. ज्यांना बुरे दिन असताना साथ दिली, ते अच्छे दिन आल्यावर सोडून गेले. यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल उद्धव ठाकरेंनी आज बोरिवलीतील जाहीर सभेत बोलताना केला.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एकीकडे पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये रावण जाळण्यात आला. तर दुसरीकडे शिवसेनेनं शस्त्रपूजन करत शस्त्रं परजली आहेत. 

शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा यंदा आचारसंहितेच्या कारणामुळे झाला नाही. त्याऐवजी उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करत पारंपरिक शस्त्रपूजन करण्यात आलं. यावेळी राजकीय कार्यक्रम आणि राजकीय भाषणं मात्र झाली नाहीत. 

बोरिवलीत झालेल्या सभेत बोलतांना उद्धव ठाकरेंनी चौफेर टीका केली. सिंचन घोटाळ्याची चौकशी झाली असती, तर अजित पवारांची जयललिता झाली असती, अशी घणाघाती टीका आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ज्याप्रमाणे जयललिता सध्या जेलमध्ये आहेत, तसंच अजित पवारही जेलमध्ये गेले असते, असं उद्धव म्हणाले.

आम्ही व्हीजन डॉक्युमेंट आणलं, पण वचननामा महायुतीचा असेल हेही व्हीजन डॉक्युमेंटच्या शेवटी नमूद केल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे महायुतीची सगळी तत्व आणि पथ्य शिवसेनेनं पाळल्याचा दावा यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

भाजपचे नेते युवा शक्तीचे गोडवे गातात, मग आदित्य चर्चेला गेल्यावर त्यांचा अहंकार का दुखावला असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. उत्तर मुंबईतल्या आठही जागा जिंकून शिवसेनेला पाठबळ देण्याचं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.