ऑडिट - अकोला, वाशिम जिल्ह्याचं

सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण, मेळघाटाचं सृष्टीसौदर्य जितकं लोभस तितकीच तिथल्या कुपोषित आदिवासींची आर्त हाकही तुम्हाला विचलित करते... नरनाळा किल्ला इथल्या ऐतिहासिकतेची साक्ष देतो. तर आदिवासी संस्कृती आजही इथे टिकवून ठेवलेली आहे.

Updated: Oct 8, 2014, 01:28 PM IST
 title=

अकोला : सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण, मेळघाटाचं सृष्टीसौदर्य जितकं लोभस तितकीच तिथल्या कुपोषित आदिवासींची आर्त हाकही तुम्हाला विचलित करते... नरनाळा किल्ला इथल्या ऐतिहासिकतेची साक्ष देतो. तर आदिवासी संस्कृती आजही इथे टिकवून ठेवलेली आहे.

अकोला जिल्ह्याचं राजकारण सध्या प्रामुख्याने फिरतेय ते तीन पक्षांभोवती... त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचा भारिप-बहुजन महासंघ, भाजप आणि शिवसेना... कधीकाळी जिल्ह्यात दबदबा असलेला कॉंग्रेस पक्ष आपल्या अस्तित्वासाठी झगडताना दिसतोय. कारण गेल्या वीस वर्षांपासून जिल्ह्यात काँग्रेसचा ना आमदार आहे ना खासदार... तर राज्यात एक नंबरची स्पर्धा करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात फ़क़्त नाममात्र उरलाय. सध्या अकोल्यात भाजपचा खासदार आहे. भारिप बहुजन महासंघाकडे सध्या अकोला जिल्हा परिषद आणि काँग्रेससोबत आघाडी करत अकोला महापालिका आणि पाच पंचायत समित्यांवर सत्ता आहे. 

अकोला जिल्हा विधानसभा मतदारसंघावर नजर टाकली असता इथे एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यात भाजपकडे दोन, शिवसेनेकडे एक आणि भारिप बहुजन महासंघाने दोन मतदारसंघावर विजय मिळवलेला आहे. 

अकोला पश्चिममध्ये भाजपचे गोवर्धन शर्मा विद्यमान आमदार आहेत. त्यानी काँग्रेसच्या रमाकांत खेतान यांचा 11910 मताधिक्याने पराभव केला.  

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मुर्तीजापूरमध्ये भाजपचे हरिश पिंपळे विद्यमान आमदार आहेत. 15358 एवढ्या मताधिक्याने ते विजयी झालेत. 

अकोटमध्ये शिवसेनेच्या संजय गावंडे यांनी काँग्रेसच्या सुधाकर गणगणेंचा अवघ्या 965 मतांनी पराभव करत विजयश्री खेचून आणली...

अकोला पूर्वमध्ये भारिप बहुजन महासंघाच्या हरिदास भदे यांनी शिवसेनेच्या गुलाबराव गावंडे यांचा 14244 एवढ्या मताधिक्याने पराभव करत विजय मिळवला. 

तर बाळापूरमध्ये बळीराम सिरस्कार यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरत भारिप-बहुजन महासंघाच्या पाठिंब्याने 1590 च्या मताधिक्याने विजयश्री खेचून आणली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.