ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ. आमदार म्हणून निवडून आलेले राजन विचारे आता खासदारपदी विराजमान झालेत. आता काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले रवींद्र फाटक यांना सेनेने उमेदवारी दिली आहे. ते नारायण राणे समर्थक होते. या मतदार संघात सेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे फाटक यांना ही निवडणूक सोपी जाणार आहे.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ हा उच्चभ्रू आणि सुशिक्षितांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. ठाणे शहर मतदारसंघात नौपाडा, मासुंदा तलाव, मार्केट परिसर, स्टेशन परिसर, माजिवडा, बाळकुम, घोडबंदर, महापालिका मुख्यालय आदीसह महत्त्वाच्या ठिकाणांचा यात समावेश आहे. हा मतदारसंघ शहराचा केंद्रबिंदू असल्याने याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
२००९ निवडणुकीचा विचार करता या निवडणुकीत शिवसेनेच्या राजन विचारे यांनी बाजी मारली होती. या निवडणुकीत राजन विचारे यांना ५१ हजार १० एवढी मतं मिळाली होती. तर मनसेच्या राजन राजे यांना ४८ हजार ५६९ एवढी मतं मिळाली होती. विचारे यांनी विजयश्री मिळवताना २ हजार ४४१ एवढं मताधिक्य घेतलं होतं.
काय झालीत विकासकामे?
ठाणे स्टेशन परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आलेत. क्लस्टर डेव्हलपमेंट योजना मार्गी लागली, विद्यापीठ उपकेंद्राची उभारणी , गावदेवी मार्केटचे पुनर्वसन अशी विकासकामे केल्याचं राजन विचारे सांगतात.
स्थानिक आमदार राजन विचारे यांनी लोकसभेची निवडणुकीतही बाजी मारली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाने दिलेला उमेदवार बाजी मारेल असा विश्वास त्यांना आहे.
काय आहेत समस्या?
मतदारसंघातील समस्यांचा विचार करता मागील काही वर्षांत या मतदारसंघाला अनेकविध समस्यांनी ग्रासले आहे.
वाहनांची संख्या वाढली पण रस्ते नियोजन नाही, अनेक परिसरात वाहतूक कोंडी आहे., पार्किंगची समस्या कायम आहे., ठाणे परिवहन सेवेत सुधारणा नाही. त्यामुळे लोकांची नाराजी आहे. इथे अनेक समस्या आहे तशाच आहेत, अशी टीका करत विरोधकांनी शिवसेनेच्या आमदारांवर टीकास्त्र सोडलंय.
ठाणे हा शिवसेनेचा गड आहे . लोकसभेच्या निवडणुकीत राजन विचारे आता खासदार झालेत. त्यामुळे शिवसेनेकडून विधानसभेसाठी इच्छुकांची मोठी रांग लागलीये. त्यातच मनसे किती प्रभावी ठरते हा ही कळीचा मुद्दा आहे. आघाडीच्या कोट्यातूनही ही जागा कोण लढणार यावरही अनेक गणित अवलंबून आहेत.
या मतदारसंघातील कल शिवसेनेकडे असला तरी ऐन निवडणुकीच्य़ा रिंगणात किती सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्याने येथे निवडणूक लढाई रंगणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.