सोलापूर : सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे नेतृत्व करतात. काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात विडी कामगार, यंत्रमाग कामगारांची मोठी संख्या आहे.
विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -
शिवसेना - महेश कोठे
भाजप - मोहिनी पतकी
काँग्रेस - प्रणिती शिंदे
राष्ट्रवादी - विद्या लोलगे
मनसे - सत्तार उस्मान सय्यद
अपक्ष - नरसय्या आडाम (माकप)
मुस्लिम आणि तेलगु भाषिकही इथे मोठ्या प्रमाणात आहेत. हीच व्होट बँक करत माकपाचे नरसय्या आडम यांनी इथे एकहाती निवडणुकी जिंकल्या.
आशिया खंडातील सर्वात मोठी १० हजार कामगार ची वसाहत इथे आहे. मात्र २००९ च्या निवडणुकीत लोकसंख्या पुनर्रचनेत काही सोलापूर शहराचा भाग आला आणि प्रणिती शिंदे यांनी प्रचाराचा नवा धडाका लावत ३५ हजारापेक्षा जास्त मताधिक्यानी विजयी पताका फडकावली.
- झोपडपट्टीतील विडी कामगारांसाठी घरकुल योजना
- कामगारांच्या चाळींना अडीच एफ एस आय मिळवून देणे
- पंधरा वर्षापासून रखडलेली कामे केली
- सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक उपकरने आणली
- शहरातील रस्ते आणि ड्रेनेजची कामे
- विडी कामगारांसाठी पेन्शन योजना
- अशी विविध कामे केल्यानं जनता आपल्याच पाठिशी असेल असा विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांना आहे.
विरोधकांनी मात्र या मतदारसंघात विकासच थांबल्याची टीका केली आहे.
- कामगारांच्या किमान वेतनचा प्रश्न प्रलंबित
- अनेक कामगारांना हक्काचे घर नाही
- ३० हजार लोकांची घरे अडवून ठेवल्याचा ठपका
- खड्डेमय रस्ते
- पालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांची बदली
- अशा अनेक समस्या सोलापुरात असल्याची टीका सुरू आहे.
आगामी विधानसभेच्या रणसंग्रामात कॉंग्रेसकडून प्रणिती शिंदे, माकपा कडून आडम मास्तर आणि शिवसेनेकडून काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले महेश कोठे या तिघांमध्ये तिंरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच एमआयएमचाही उमेदवार इथे किती कुणाची मते खाणार हाही उत्सुकतेचा विषय आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे विजयी उमेदवार शरद बनसोडे यांना १६ हजारांची आघाडी मिळाली होती.
ती प्रणिती शिंदे यांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्रीपद सांभाळलेले आणि केंद्रात गृहमंत्रीपद सांभाळलेले सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठीही यंदाची विधानसभेची निवडणूक सत्वपरीक्षा पाहणारी असेल यात शंका नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.