ऑडिट वर्सोवा : अर्ज बाद, शिवसेनेची मते कोणाला मिळणार?

 शिवसेनेच्या राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्यानं वर्सोवामध्ये या निवडणुकीत धनुष्यबाण नाहीय. त्यामुळं शिवसेनेची मतं कुणाच्या पारड्यात पडतात. यावर विजयाचं गणित अवलंबून असणाराय. काँग्रेसचे विद्यमान आमदार बलदेव खोसांपुढं राष्ट्रवादी, मनसे आणि भाजपचं आव्हान आहे. 

Updated: Oct 8, 2014, 11:58 AM IST
ऑडिट वर्सोवा : अर्ज बाद, शिवसेनेची मते कोणाला मिळणार? title=

मुंबई : शिवसेनेच्या राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्यानं वर्सोवामध्ये या निवडणुकीत धनुष्यबाण नाहीय. त्यामुळं शिवसेनेची मतं कुणाच्या पारड्यात पडतात. यावर विजयाचं गणित अवलंबून असणाराय. काँग्रेसचे विद्यमान आमदार बलदेव खोसांपुढं राष्ट्रवादी, मनसे आणि भाजपचं आव्हान आहे.

वर्सोवातून काँग्रेसचे आमदार बलेदव खोसा पाचव्यांदा निवडून जाण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. मुस्लिम आणि उत्तर भारतीयांची मतदारांची संख्या इथं अधिक आहे आणि त्यांची मोट बांधण्यात बलदेव खोसा यशस्वी होत असल्यानं त्यांचा विजय आतापर्यंत सुकर झालाय. 

परंतु आता भाजपकडं वळत असलेला उत्तर भारतीय समाज तसंच इथून उभा असलेल्या एमआयएमच्या उमेदवारामुळं मुस्लिम मतांमध्ये फूट पडू शकते. याचा फटका खोसांना काही प्रमाणात बसणार असला तरी समोर तुल्यबळ उमेदवार उमेदवार नसल्याचा फायदा त्यांना होवू शकतो. 

बलदेव खोसांपुढं आव्हान असणाराय राष्ट्रवादीचे नरेंद्र वर्मा यांचं. उत्तर भारतीय मतांवर त्यांचा डोळा आहे. तर शिवसेनेचा उमेदवार नसल्यानं मराठी मत आपल्या पारड्यात फिरवण्यासाठी मनसेचे उमेदवार मनिष धुरी प्रयत्नशील आहेत.

भाजपच्या डॉ. भारती लव्हेकरही मैदानात आहेत. शिवसेनेनं अजून कुणालाही आपला पाठिंबा जाहीर केला नसल्यानं त्यांची भूमिका इथं महत्वाची असणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.