ऑडिट नागपूर जिल्ह्याचं...

महाराष्ट्राची उपराजधानी असं ज्या शहराची ओळख आहे. संत्रानगरी नागपूर, देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं हरीत शहर... भारताचा मध्य अशी अनेक वैशिष्ट्य लाभलेला नागपूर जिल्हा. राज्याच्या राजकीयपटलावर या जिल्ह्याला महत्त्व आहे. 

Updated: Oct 8, 2014, 05:49 PM IST
 title=

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी असं ज्या शहराची ओळख आहे. संत्रानगरी नागपूर, देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं हरीत शहर... भारताचा मध्य अशी अनेक वैशिष्ट्य लाभलेला नागपूर जिल्हा. राज्याच्या राजकीयपटलावर या जिल्ह्याला महत्त्व आहे. 

नागपूर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी 7 भाजपच्या ताब्यात, 3 काँग्रेस तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात प्रत्येकी एक विधानसभा मतदारसंघ आहे. 

काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख आमदार आहेत, सावणेर विधनसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व काँग्रेसचे केदार सुनिल करत आहेत. 

हिंगणामधून विजयबाबू घोडमारे हे भाजपचे आमदार आहेत. उमरेडमधून भाजपचे सुधीर पारवे हे आमदार आहेत.

नागपूर दक्षिण पश्चिमचं प्रतिनिधीत्व भाजपचे देवेंद्र फडणवीस करत आहेत. तर नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून दिनानाथ पाडोले हे काँग्रेसचे आमदार आहेत.

नागपूर पूर्वमधून कृष्णा खोपडे हे भाजपचे आमदार आहेत.नागपूर मध्यचं प्रतिनिधीत्व भाजपचे विकास कुंभारे करत आहेत. 

भाजपचे सुधाकर देशमुख हे नागपूर पश्चिमचे आमदार आहेत.नागपूर उत्तरचं प्रतिनिधीत्व काँग्रेसच्या नितीन राऊत यांच्याकडे आहे.

कामठीमधून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आमदार आहेत.तर रामटेकचं प्रतिनिधीत्व शिवसेनेचे अशिष जैस्वाल यांच्याकडं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x