नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्यातील आणखी एक महत्वाचा मतदारसंघ... संत्रा उत्पादनासाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. राजकीय दृष्ट्याविचार केल्यास काटोल हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो.
विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -
शिवसेना - राजू हर्णे
भाजप - आशिष देशमुख
काँग्रेस - दिनेश ठाकर
राष्ट्रवादी - अनिल देशमुख
मनसे - दिलीप गायकवाड
अपक्ष - राहुल देशमुख (शेकाप)
या विधानसभा मतदारसंघात ३ लाख २१ हजार एव्हडी मतदार संख्या असून राज्याचे सध्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख हे १९९५ पासून सलग ४ टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत.
गेल्या विधानसभा निवडणूकीत ( २००९ ) अनिल देशमुख यांनी ३२,२०३ मताधिक्याने काटोलमधून विजय मिळवला होता.
अनिल देशमुख यांना ६८,१४३ तर आरपीआय आठवले गटाचे चरण सिंह ठाकूर यांना ३५,९४० मते मिळाली होती. शिवसेनेचे किरण पांडव यांना ३१,३७२ मते मिळाली होती.
काटोल विधानसभा मतदारसंघात
- ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजना
- गावांना जोडणारे रस्ते
- सिंचना बंधा-यांची निर्मिती
- सावनेर तालुक्यात १,२३२ कोटींचा कुची प्रकल्प
अशी एकूण १,४४० कोटी रुपयाची विविध विकास कामे आपण केल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केलाय. अनिल देशमुख, काटोल विधान संघाचे मतदार संघाचे आमदार आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तेसच ग्राहक संरक्षण मंत्री आहेत.
अनिल देशमुख यांच्या या विकास कामांच्या दाव्याविषयी विरोधकांचं हे म्हणणे आहे. राहुल देशमुख, हे उमेदवार शेकाप आणि २००९ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते.
अनिल देशमुख गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत असले तरी काटोल विधानसभा मतदारसंघातील काही समस्या आजही कायम आहेत.
मतदारसंघातील कायम असलेले प्रश्न
- रस्त्यांची दुरवस्था
- संत्रा प्रक्रिया केंद्राची आवश्यकता
- सिंचनाच्या सुविधांचा अभाव
- गारपीटग्रस्त शेतकरी मोबदल्याच्या प्रतिक्षेत
निवडणुकीच्या दृष्टीने या विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोक सभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांना काटोल विधान सभा मतदार संघातून ३८,४४६ मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे शिवसेनेच्या आशा नक्कीच वाढल्या असणार. गेल्यावेळचे सेनेचे उमेदवार किरण पांडव यांना यावेळी उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर आहे.
शिवसेनेकडून जिल्हा अध्यक्ष राजू हरणे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.तसेच नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले भुजबळ समर्थक किशोर कन्हेरे यांच्या नावाची चर्चा आहे. काटोल नगर परिषदेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार राहुल देशमुख यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
सलग २२ वर्ष सत्तेत असलेल्या अनिल देशमुखांच्या तोडीचा एकही उमेदवार आज एकाही विरोधी पक्षाकडे नाही.तसेच विरोधकांतील फाटाफुटीचा फायदा देशमुखांना होत आला आहे.
या निवडणुकीत शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळते, चरण सिंह ठाकूर कोणती भूमिका घेतात आणी राहुल देशमुख किती मते मिळवतात यावर या विधानसभेचं आगामी चित्र पहायला मिळेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.