ऑडिट सांगली जिल्ह्याचं...

सांगली नाट्यपंढरी, सहकारपंढरी म्हणून जेवढी प्रसिद्ध तेव्हढीच क्रांतीकारकांची जवानांची नगरी म्हणूनही सांगलीची ओळख आणि राजकीय पटलावर चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवलेले वसंतदादा पाटील हेही याच सांगली जिल्ह्याचे सुपूत्र.

Updated: Oct 8, 2014, 05:19 PM IST
 title=

सांगली : सांगली नाट्यपंढरी, सहकारपंढरी म्हणून जेवढी प्रसिद्ध तेव्हढीच क्रांतीकारकांची जवानांची नगरी म्हणूनही सांगलीची ओळख आणि राजकीय पटलावर चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवलेले वसंतदादा पाटील हेही याच सांगली जिल्ह्याचे सुपूत्र.

राजारामबापू बापू पाटील यांनी या जिल्ह्यात सहकाराची बिजं रोवली. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या संजयकाका पाटील यांनी काँग्रेसला दणका देत विजयश्री खेचून आणली आहे.

राज्याचे विद्यमान गृहमंत्री आर आर पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील अशा दिग्गज नेत्यांचा हा जिल्हा आहे.

जिल्हयाचं एकूणच पक्षीय बलाबल बघता पाहता, भाजपचे तीन आमदार, काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि एक अपक्ष आमदार जिल्ह्यात आहेत.
 
तासगावमध्ये गृहमंत्री आर आर पाटील आमदार म्हणून आहेत. इस्लामपूरमध्ये ग्रामविकासमंत्री जयंत पाटील तब्बल पाच वेळा निवडून आलेले आहेत. 

वनमंत्री डॉ. पतंगराव कदम पलूस-केडगाव या मतदार संघातून निवडून आलेत. खानापूरमध्ये काँग्रेसचे सदाशिव पाटील आहेत. मिरजमधून भाजपचे सुरेश खाडे निवडून आलेत. 

सांगलीतून संभाजी पवार भाजपच्या तिकीटावर निवडून आलेत. जतमधून भाजपचेच प्रकाश शेंडगे विद्यमान आमदार आहेत. तर शिराळामधून मानसिंग नाईक यांनी चुरशीच्या लढतीत बाजी मारत अपक्ष म्हणून लढत जिंकली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.