ऑडिट सातारा जिल्ह्यातील मतदारसंघांचं

सातारा जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी वाढत चालली आहे. तर सेना-भाजप युतीतही रोज फटाके फुटू लागलेत. विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केलीय.. त्यामुळे इच्छुकही सरसावले आहेत.

Updated: Oct 8, 2014, 03:41 PM IST
 title=

सातारा : सातारा जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी वाढत चालली आहे. तर सेना-भाजप युतीतही रोज फटाके फुटू लागलेत. विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केलीय.. त्यामुळे इच्छुकही सरसावले आहेत.

विकासकामांच्या दाव्यांचा पूर वाहू लागलाय. मात्र आम्ही दाखवणार आहोत मतदारसंघातील वास्तव आणि आज आपण ऑडिट करणार आहोत सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचं.

क्रांतीकारकांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, ज्येष्ट नेते किसनवीर लोकनेते बाळासाहेब देसाई, यांनी महाराष्ट्राला दिशा दिली आता याच सातारा जिल्ह्याचे सुपुत्र नामदार पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करत आहेत. 

सातारा जिल्ह्यात एकूण ८ विधानसभा मतदार संघ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सातारा जिल्ह्याची सध्या ओळख आहे. सातारा जावळी मतदार संघात शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार आहेत. फलटण मतदार संघातून आमदार दिपक चव्हाण नेतृत्व करतात. 

कोरेगाव मतदार संघ आमदार शशिकांत शिंदे तर पाटण मतदार संघ आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आहे. 

वाई महाबळेश्वर खंडाळा मतदार संघात चुरशीच्या लढतीत मकरंद पाटील यांनी, तर कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार म्हणून चुरशीच्या लढतीत विजय मिळवला होता. नंतर या दोघांनी राष्ट्रवादीलाच पाठिंबा दिला. 

तर माण खटाव मतदार संघात काँग्रेस बंडखोर उमेदवार जयकुमार गोरे विजयी झाले. 

कराड दक्षिण मधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार विलासकाका उंडाळकर पाटील विजयी झाले. एकूणच राष्ट्रवादी ६ तर काँग्रेस २ असे संख्याबळ सातारा जिल्ह्यात आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.