पुणे : पुण्यामधल्या एका अवघ्या १० महिन्यांच्या बाळाला लठ्ठपणाचा अजब आजार जडलाय.
या बाळाचं नाव श्रीजित हिंगणकर असं आहे. १० महिन्यांच्या श्रीजितचं वजन १७ किलो आहे तर उंची ७५.५ सेंटीमीटर आहे.
श्रीजितचा आहार मात्र एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे आहे. २ चपाती, दीड लिटर दूध आणि ५-६ बिस्किट तो एका वेळी खातो.
श्रीजितला 'लेप्टींगजिन रोटेशन डेफिशिअन्सी' हा लठ्ठपणाचा आजार जडलाय. औषधांचा या बाळावर काहीही परिणाम झाला नाही तर त्याच्यावर सर्जरी करावी लागेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
हा आजार दूर करण्यासाठी या बाळावर अशी सर्जरी करण्यात आली तर अशा प्रकारची सर्जरी करण्यात येणारं आत्तापर्यंत हे जगातील सर्वात लहान बाळ ठरेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.