कामोठेत दहा वर्षीय मुलीवर घरात घुसून रेप

कामोठे येथे झाडूकाम  करणाऱ्या ३५ वर्षीय ईसमाने शेजारी रहाणाऱ्या दहा वर्षीय मुलीवर घरात कोणी नसताना तिच्यावर अत्याचार केला, यामध्ये या तरुणाला पोलीसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. 

Updated: Jul 15, 2014, 05:55 PM IST
कामोठेत दहा वर्षीय मुलीवर घरात घुसून रेप title=

नवी मुंबई : कामोठे येथे झाडूकाम  करणाऱ्या ३५ वर्षीय ईसमाने शेजारी रहाणाऱ्या दहा वर्षीय मुलीवर घरात कोणी नसताना तिच्यावर अत्याचार केला, यामध्ये या तरुणाला पोलीसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. 

जीतेद्रर उर्फ मोनू महेंद्र सिंग लोटरे असे या पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर कामोठे पोलीसांनी कलम ३७६ अंतर्गत  गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे, शेजारी राहणाऱ्या दहा वर्षाची चिमुरडी एकटी आहे, हे बघितल्यावर या व्यक्तीने घरात घुसून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले, झालेला प्रकार पिडीत मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितला त्या नंतर ही घटना उघडकीस आली . 

या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत महेंद्र सिंगला अटक केली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.