कोल्हापुरातील ३१० अनधिकृत धार्मिक स्थळांवर पडणार हातोडा

कोल्हापुरातील ३१० अनधिकृत धार्मिक स्थळांवर हायकोर्टच्या आदेशानुसार कारवाई होणार आहे. तशी नोटीस पालिकेने पाठविली आहे.

Updated: Nov 23, 2015, 05:06 PM IST
कोल्हापुरातील ३१० अनधिकृत धार्मिक स्थळांवर पडणार हातोडा title=

 कोल्हापूर : कोल्हापुरातील ३१० अनधिकृत धार्मिक स्थळांवर हायकोर्टच्या आदेशानुसार कारवाई होणार आहे. तशी नोटीस पालिकेने पाठविली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेनं या अनधिकृत धार्मिक स्थळांना तशी नोटीस काढली आहे. वाहातुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या फूटपाथवर आणि रस्त्याच्या मध्यभागी उभारलेल्या धार्मिक स्थळांचाही यात समवेश आहे. 

शहरातील विविध भागात ३१० धार्मिक स्थळं उभारण्यात आली आहेत. त्यांना एक महिन्याच्या आत आपल्या हरकती आणि म्हणणे मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. मुदतीनंतर आलेल्या सूचनांचा विचार केला जाणार नसल्याचेही या जाहीर नोटीशीमध्ये म्हटले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.