पनवेल येथे ४.२८ कोटींची स्पोर्टस् कार पाहण्यासाठी गर्दी

नवी मुंबईत पनवेल आरटीओत आज ४ कोटी २८ लाखांची  विदेशी बनावटीची टू सिटर स्पोर्टस कार रजिस्टर करण्यात आली आहे. 

Updated: Dec 14, 2016, 08:50 PM IST
पनवेल येथे  ४.२८ कोटींची स्पोर्टस् कार पाहण्यासाठी गर्दी

नवी मुंबई : नोटाबंदीची झळ सर्वसामान्य नागरिक सोसत असतांना शौकीनांच्या उत्साह मात्र कमी झालेला दिसत नाही. नवी मुंबईत पनवेल आरटीओत आज ४ कोटी २८ लाखांची  विदेशी बनावटीची टू सिटर स्पोर्टस कार रजिस्टर करण्यात आली आहे. या कारसाठी कर्ज घेण्यात आलेले नाही हे विशेष.

द्रोणागिरीतल्या एका खासगी कंपनीच्या नावावर  रजिस्टर असलेली ही अलिशान स्पोर्टस् कार विनाकर्ज घेतल्याचे पनवेल आरटीओ विभागाला सादर केलल्या कागदपत्राततून दिसून येत आहे. शिवाय ८६ लाख रुपयांचा टॅक्स या गाडीसाठी परिवहन विभागाला भरण्यात आला आहे. ही आलिशान स्पोर्टस् कार बघण्यासाठी पनवेल आरटीओत गर्दी झाली होती.