मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील अपघातात ४ ठार, ८ जखमी

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झालाय तर ८ जण जखमी झालेत. यातील चौघाची प्रकृती चिंताजनक आहे. बौर गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. 

Updated: Apr 25, 2015, 04:56 PM IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील अपघातात ४ ठार, ८ जखमी title=

मुंबई : पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झालाय तर ८ जण जखमी झालेत. यातील चौघाची प्रकृती चिंताजनक आहे. बौर गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. 

पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणा-या एका स्कॉर्पियो गाडीनं पुढे जात असलेल्या एका ट्रकला मागून जोरात धडक दिली ही धडक इतकी जबरदस्त होती की यात चौघंजण जागीच ठार झाले.

अपघातातील जखमींना निगडी येथील लोकमान्य हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. स्कॉर्किपोमधील सर्वजण उस्मानाबादहून कळंबोली येथे निघाले होते. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवली असून मृतांची नावे मात्र अद्याप कळू शकलेली नाहीत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.