मुंबई: नेपाळमध्ये आज सकाळी भूकंपाचे ७.९ रिश्टर स्केलचे तीव्रतेचा भूकंप झाला आहे. नेपाळमध्ये काही भारतीय पर्यटकही अडकल्याची माहिती आहे. यामध्ये महाराष्ट्राचे ५५६ पर्यटकांचा समावेश आहे. सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती आहे.
अडकलेल्या सर्व पर्यटकांशी संपर्क झालेला आहे. अडकलेल्या पर्यटकांमध्ये चौधरी ट्रॅव्हल्सचे १००, वीणा वर्ल्डचे ४०० आणि केसरी टूर्सचे ५६ पर्यटकांचा समावेश आहे.
नेपाळमध्ये फिरायला गेलेले हे सर्व भारतीय नागरीक सुदैवाने या भूकंपातून सुखरूप बचावले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.