उद्या ४४ टोल बंद, एसटीलाही सवलत

राज्यातील टोलनाके उद्यापासून टप्प्याटप्प्याने बंद होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 44 टोलनाके बंद होणार असून, उद्यापासून एसटीला कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय...

Updated: Jun 30, 2014, 06:55 PM IST
उद्या ४४ टोल बंद, एसटीलाही सवलत title=

नाशिक : राज्यातील टोलनाके उद्यापासून टप्प्याटप्प्याने बंद होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 44 टोलनाके बंद होणार असून, उद्यापासून एसटीला कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय...

दरम्यान, या टोलनाके बंद करण्याच्या निर्णयाविरोधात काही कंत्राटदारांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने सरकारच्या निर्णयास स्थगिती देण्यास साफ नकार दिला. टोलनाके बंद होणा-या कंत्राटदारांना 604 कोटी रूपयांची नुकसानभरपाई सरकारने जाहीर केलीय. मात्र कंत्राटदारांना 3 हजार कोटी रूपयांचा फटका बसणार असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता.

कोर्टाने कंत्राटदारांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. महाराष्ट्रात एकूण 166 टोलनाके आहेत. त्यातील 73 टोलनाके सार्वजनिक बांधकाम खात्याचे, 53 एमएसआरडीसीचे, 44 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आहेत. यापैकी सार्वजनिक बांधकाम खात्याचे 34 आणि एमएसआरडीसीचे 10 टोलनाके बंद होणार आहेत...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.