नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर कोकणगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात ५ डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या अपघातात डॉ. उमेश भोसले हे गंभीर जखमी झाले आहेत. डॉ. संजय तिवारी, डॉ. सुरेश पाटील, डॉ. शेळके, डॉ. चंद्रशेखर गांगुर्डे आणि डॉ. कुंदन जाधव हे जागीच मृत्युमुखी पडले आहेत.
डॉक्टरांची टवेरा गाडी ही नाशिकहून पिंपळगावला जात असतांना हा अपघात झाला, टवेरा गाडीला कंटेनरची धडक बसली आहे.
चुकीच्या दिशेने आला टेम्पो
टवेराला कोकणगाव फाट्याजवळ कंटेनरही धडक दिली, वेगात असलेल्या टवेरासमोर चुकीच्या बाजूने येऊन कंटेनर धडकलाय. या अपघातात ५ डॉक्टरांना जागीच आपली जीव गमवावा लागला आहे.
नाशिक-आग्रा महामार्गावर जड वाहनं शिस्तीत चालवली जात नसल्याच्या अनेक तक्रारी ऐकण्यात येतात, मात्र परिवहन अधिकाऱ्यांनी याकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. जड वाहने नेहमीच चुकीच्या लेनमध्ये चालत असतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.