औरंगाबाद : दगडफेक करणाऱ्या शिक्षकांवर कलम 307 अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा औरंगाबाद पोलिसांनी दाखल केलाय.
सोबतच दंगल भडकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिक्षकांनी केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या डोक्यालाही मारहाण झाल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय.
याप्रकरणी 57 शिक्षकांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेत. आणखी तीनशे शिक्षकांना अटक होण्याची शक्यताय.