भयंकर! केवळ 500 रुपयांसाठी दोन चिमुरड्यांचे गळे चिरून हत्येचा प्रयत्न

शहरातील मानकापूर भागात एका व्यक्तीनं दोन लहान मुलांचे गळे चिरल्याचं समोर येतंय.

Updated: Oct 5, 2016, 11:45 PM IST
भयंकर! केवळ 500 रुपयांसाठी दोन चिमुरड्यांचे गळे चिरून हत्येचा प्रयत्न title=

नागपूर : नागपूरमध्ये केवळ पाचशे रुपयांसाठी शेजाऱ्यानंच दोन लहानग्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

नागपूरच्या मानकापूर भागात शेजा-यानं दोन मुलांच्या आईकडून पाचशे रुपयांची मागणी केली. मात्र महिलेनं पैसे देण्यास नकार दिल्यामुळं आरोपीनं मुलांची गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न केला.

यात दोन्ही मुलं गंभीर जखमी झाले असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे आरोपी विलास भुजाडे यानं मुलांचे गळे चिरल्यानंतर स्वत:चा गळा कापून  आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.