यवतमाळमध्ये हिवरीजवळ अपघातात ६ ठार, २ जखमी

नागपूर-तुळजापूर मार्गावरील हिवरी गावाजवळ स्कॉर्पिओला ट्रकची जेरदार धडक बसल्याने भीषण अपघात झालाय.

Updated: Jan 23, 2017, 04:00 PM IST
यवतमाळमध्ये हिवरीजवळ अपघातात ६ ठार, २ जखमी title=

यवतमाळ : नागपूर-तुळजापूर मार्गावरील हिवरी गावाजवळ स्कॉर्पिओला ट्रकची जेरदार धडक बसल्याने भीषण अपघात झालाय.

यवतमाळमध्ये हिवरी जवळ स्कॉर्पिओला ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात 6 जण जागीच ठार झालेत. मृतांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे.  

तर 2 जण गंभीर जखमी आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांवर जवळच्या  जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.