7 वर्षीय चिमुरडीची हत्या; लोणावळ्यात उत्स्फुर्त बंद

लोणावळयाच्या कुमार रिसॉर्ट हॉटेलमध्ये एका लग्न समारंभासाठी आलेल्या एका सात वर्षाच्या मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. 

Updated: Feb 18, 2015, 01:49 PM IST
7 वर्षीय चिमुरडीची हत्या; लोणावळ्यात उत्स्फुर्त बंद title=

लोणावळा : लोणावळयाच्या कुमार रिसॉर्ट हॉटेलमध्ये एका लग्न समारंभासाठी आलेल्या एका सात वर्षाच्या मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. 

मुलीची हत्या करण्यापुर्वी तिच्यावर अतिप्रसंग झाला असल्याच्या शक्यतेनं या संतापात भर पडलीय. हॉटेलच्या टेरेसवर तिचा मृतदेह सापडल्यानंतर संतापलेले नागरिक रस्त्यावर उतरून याचा निषेध करत आहेत. ही मुलगी मुळची रायगड जिल्ह्यातल्या इंदापूरची रहिवासी आहे.

सुरक्षेमध्ये हय-गय करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्याचीही मागणी करत आज लोणावळा बंदची हाक देण्यात आलीय.

काल रात्री पालकमंत्री गिरीष बापट यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नागरीक तसंच मुलीच्या नातलगांशी संवाद साधला. मुलीचं पोस्टमार्टम इन कॅमेरा करण्यात यावं ही नातलगांची मागणी मान्य करीत पुण्यातील ससून रुग्णालय तसेच पोलिसांना असे आदेश देण्यात आल्याचं बापट यांनी म्हटलंय.

अत्यंत नावाजलेल्या असलेल्या या हॉटेलमध्ये केवळ ३० ते ३५ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असून यातील केवळ १० च कॅमेरे चालू असल्याचं या घटनेनंतर उघड झालंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.