बीडमध्ये गणेश महोत्सवात आर्ची आणि परश्याची हजेरी

महाराष्ट्रात गणेसोत्सवाची सध्या धूम आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या आणि सर्व मराठी सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक करणा-या सैराट सिनेमाची धूमही यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. सैराट सिनेमातील अभिनेत्री आर्ची आणि अभिनेता परश्या यांनी बीडमधील श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवात हजेरी लावली.

Updated: Sep 6, 2016, 05:04 PM IST
बीडमध्ये गणेश महोत्सवात आर्ची आणि परश्याची हजेरी

मुंबई : महाराष्ट्रात गणेसोत्सवाची सध्या धूम आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या आणि सर्व मराठी सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक करणा-या सैराट सिनेमाची धूमही यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. सैराट सिनेमातील अभिनेत्री आर्ची आणि अभिनेता परश्या यांनी बीडमधील श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवात हजेरी लावली.

Dhanajay Munde Ganpati 3

सैराट फेम आर्ची आणि परश्या म्हणजेच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी परळी वैजनाथ येथील गणेश महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. परळी येथील नाथ प्रतिष्ठानच्या श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवास सुरुवात झाली असून भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे. यावेळी धनंजय मुंडे यांच्या हस्ते आर्ची आणि परश्या यांचा सत्कारही करण्यात आला. 

Rinku and Aakash

Dhanajay Munde Ganpati 6