आमीर खानची कोल्हापूरच्या मोतीबाग आखाड्यात 'दंगल'

ताकद आणि बुद्धी यांचं मिश्रण असल्याशिवाय कुस्ती खेळताच येत नाही, असं वक्तव्य बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं केलं आहे. 

Updated: Dec 19, 2016, 06:31 PM IST
आमीर खानची कोल्हापूरच्या मोतीबाग आखाड्यात 'दंगल' title=

कोल्हापूर : ताकद आणि बुद्धी यांचं मिश्रण असल्याशिवाय कुस्ती खेळताच येत नाही, असं वक्तव्य बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं केलं आहे. कोल्हापूरच्या मोतीबाग आखाड्याला आमीरनं आज भेट दिली. यावेळी रुस्तम-ए-हिंद दादू चौगुले आणि हिंदकेसरी विनोद चौगुले यांचीही त्यानं भेट घेतली.

आमीरचा कुस्तीवर आधारित दंगल हा चित्रपट शुक्रवारी रुपेरी पडद्यावर झळकतोय. त्याचं प्रमोशन करण्यासाठी आमीरनं कुस्तीचं माहेरघर असलेल्या करवीरनगरीला भेट दिली. सुलतानही चांगला सिनेमा आहे. सुलतान किंवा दंगलमध्ये कोण जिंकतं यापेक्षा या दोन्ही चित्रपटांमुळे कुस्तीची जित होणं महत्त्वाचं असल्याचंही आमीरनं म्हटलंय. मोतीबाग आखाड्यात आलेल्या आमीरनं मुलींचे मॅटवरचे कुस्ती सामनेही बघितले.