सोलापूरमध्ये खाजगी बसला अपघात, आठ ठार

शिर्डीहून पंढरपूरला जाणारी खासगी बस मंगळवारी पहाटे सोलापूरमध्ये नदी पात्रात कोसळल्यानं भीषण अपघात घडलाय. अपघातात बसमधील ८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

Updated: Oct 7, 2014, 12:40 PM IST
सोलापूरमध्ये खाजगी बसला अपघात, आठ ठार title=

सोलापूर: शिर्डीहून पंढरपूरला जाणारी खासगी बस मंगळवारी पहाटे सोलापूरमध्ये नदी पात्रात कोसळल्यानं भीषण अपघात घडलाय. अपघातात बसमधील ८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

मृतांमध्ये सहा महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असून यातील बहुसंख्य प्रवासी हे आंध्रप्रदेशमधील रहिवासी असल्याचं समजतं. सोलापूर इथल्या करमाळा - टेंभुर्णी रोडवर एक खासगी बस मंगळवारी पहाटे नदीपात्रात कोसळली. 

या अपघातात आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केलं. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.