मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातात तीन जण जागीच ठार

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रविवारी पहाटे कामशेत बोगद्याजवळ एका गाडीला झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय.

Updated: Jul 17, 2016, 08:44 AM IST
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातात तीन जण जागीच ठार title=

पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रविवारी पहाटे कामशेत बोगद्याजवळ एका गाडीला झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय.

मुंबईवरुन पुण्याच्या दिशेने ही गाडी जात असताना ही गाडी दुभाजकावर आदळल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडीतील तीन जण जागीच ठार झाले.

या अपघातात ठार झालेले तिघेही पिंपरीचे रहिवासी होते. अमित सोलेभाविकर, संतोष उडवंत आणि शरद कृष्णराव पवार अशी मृतांची नावे आहेत. 

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघातांची मालिका सुरु आहे.