मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ऑइलचा टँकर लीक

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर मध्यरात्री 2.30 च्या सुमारास एक कंटेनर ऑईल टँकरला धडक देऊन निघून गेल्याने ऑइलचा टँकर लीक झाला.

Updated: Jul 17, 2016, 08:14 AM IST
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ऑइलचा टँकर लीक title=

लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर मध्यरात्री 2.30 च्या सुमारास एक कंटेनर ऑईल टँकरला धडक देऊन निघून गेल्याने ऑइलचा टँकर लीक झाला.

त्यामुळे झालेल्या ऑइल गळतीमुळे रस्त्यावर ऑइल पसरले. परिणामी मुंबई कडून पुण्याकडे जाणारी वाहतूक 2.30 वाजल्या पासून विस्कळीत झाली आहे.

मार्गावर सांडलेले ऑइल धुवून काढण्यात आले असले तरी झालेली वाहतूक कोंडी पूर्ववत होण्यासाठी आजून एक ते दीड तास लागण्याची शक्यता आहे.