शेतकऱ्यांचा काढणार अपघाती विमा, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या कामाची बातमी... शेतामध्ये काम करतांना अनेकवेळा शेतकऱ्याचा अपघाती मुत्यू होतो. घरातील कर्ता पुरुष गेल्यानं शेतकरी कुटुंबावर अनेक अडचणी येतात. त्यामुळं राज्यातील एक कोटी ३५ लाख खातेदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं अपघाती विमा काढण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Sep 1, 2015, 03:58 PM IST
शेतकऱ्यांचा काढणार अपघाती विमा, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय title=

मलकापूर, बुलडाणा : शेतकऱ्यांच्या कामाची बातमी... शेतामध्ये काम करतांना अनेकवेळा शेतकऱ्याचा अपघाती मुत्यू होतो. घरातील कर्ता पुरुष गेल्यानं शेतकरी कुटुंबावर अनेक अडचणी येतात. त्यामुळं राज्यातील एक कोटी ३५ लाख खातेदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं अपघाती विमा काढण्याचा निर्णय घेतलाय. 

सर्वच शेतकऱ्यांना २ रु. किलो गहू, ३ रु. किलो तांदूळही मिळणार 

विम्याच्या हफ्त्याची सर्व रक्कम सरकार भरणार आहे. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला विम्याची दोन लाख रुपयांची रक्कम कंपनीकडून मिळेल. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी ही माहिती आहे. 

आणखी वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्याला २ दिवस सुटी मिळणार?

दरम्यान अल्पभूधारक शेतकऱ्यांना २ रुपये किलोनं गहू तर ३ रुपये किलोनं तांदूळ मिळत होता. परंतु दुष्काळी स्थितीत राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना आता दोन रुपये किलोनं गहू आणि तीन रुपये किलोनं तांदूळ देण्याचा शासनानं निर्णय घेतलाय. त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली असल्याची माहिती भाजप आमदार चैनसुख संचेती यांनी दिली आहे. 

आणखी वाचा - गुड न्यूज: आता गॅस कनेक्शन मिळणार ऑनलाइन

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.