नाशिक : एका इंग्रजी शाळेतील विद्यार्थिनीवर नाशिक शहरात सामुहिक बलात्काराची घटना उघड झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी निर्जन ठिकाणी बसलेल्या युगुलांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे.
महापलिकेच्या शिक्षण विभागाने ही मान्यता रद्द करण्याची नोटीस देत शाळांबाबतीत सीसीटीव्ही लावने बंधनकारक केले असून सर्वच शाळांची झाडाझडती या निमिताने घेणार आहे.
एका आठवीच्या मुलावर पाच दहावीतील मुलांनी सामुहिक बलात्काराच्या घटनेने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. महापलिका क्षेत्रातील शाळा आणि त्यांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळात प्रत्येक वर्गात आणि परिसरात सीसीटीव्ही लावणे अत्यावश्यक करण्याविषयी पोलीस गांभीर्याने विचार करत आहे. सध्या निर्जन परिसरात बसलेली मुले मुली यांच्या बाबतीत अशा घटना होऊ शकतात हे लक्षात घेऊन त्यांची चौकशी करून त्यांच्या आईवडीलाना माहिती दिली जात आहे
शिक्षण विभागाने शाळांमधील आई वडिलांचा वेगळा ग्रुप करण्याची सक्ती केलेली आहे. यापुढे मुलमुली गणवेशाव्यतिरिक्त शाळेत कपडे घेऊन जाण्यावर बंधने आणली आहेत. पालकांचा मुलांचा आणि शिक्षकांचा वाढता संवाद वाढविण्याकडे कल आहे. गैरहजर असल्यास त्याच्या पालकांना माहिती देणे सक्तीचे करण्यात येणार आहे. इतकेच नाही तर घटना घडलेल्या शाळांना मान्यता रद्द करण्याची नोटीस देत शाळांना सज्जड इशारा देण्यात आला आहे
अशा घटना होऊ नये म्हणून प्रामुख्याने खाजगी कोचिंग क्लासेसच्या वातावरणावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे अन्यथा या कारवाईला मर्यादित स्वरूप होईल.