नागपूर जेल: कैद्यांकडून आणखी ७ मोबाईल फोन्स जप्त

झी मीडियाच्या बातमीनंतर नागपूर जेलची झाडाझडती सुरु झालीय. या तपासणीत जेलमधून आणखी ७ मोबाईल्स आणि काही चार्जर्स सापडलेत. 

Updated: Apr 5, 2015, 03:57 PM IST
नागपूर जेल: कैद्यांकडून आणखी ७ मोबाईल फोन्स जप्त title=

नागपूर: झी मीडियाच्या बातमीनंतर नागपूर जेलची झाडाझडती सुरु झालीय. या तपासणीत जेलमधून आणखी ७ मोबाईल्स आणि काही चार्जर्स सापडलेत. 

बडी गोल बॅरेकमध्ये हे मोबाईल सापडले आहेत. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे महासंचालक प्रविण दीक्षित जेलमध्ये असताना हे मोबाईल सापडलेत. मुख्य म्हणजे शुक्रवारी रात्री कारागृहाची झडती घेतली असता, २६ मोबाईलसह ११ बॅटऱ्या जप्त केल्या गेल्या. 

नागपूर कारागृहात सर्रास मोबाईल उपलब्ध होत असल्याची बातमी झी मीडियानं दाखवली. त्यानंतर जाग्या झालेल्या तुरुंग प्रशासनानं ही कारवाई केली. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल झालेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.