पवारांना होमटाऊनमध्येच धक्का, साखर कारखान्यातील सत्ता खालसा

अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातल्या माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. तब्बल ३० वर्षांनंतर साखर कारखान्यात सत्तापरिवर्तन झालंय.

Updated: Apr 5, 2015, 04:11 PM IST
पवारांना होमटाऊनमध्येच धक्का, साखर कारखान्यातील सत्ता खालसा title=

माळेगाव, बारामती: अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातल्या माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. तब्बल ३० वर्षांनंतर साखर कारखान्यात सत्तापरिवर्तन झालंय.

एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होती. सहकार बचाव पॅनलनं १५ जागा जिंकत अजित पवारांना धक्का दिलाय. सहकार पॅनेलचे प्रमुख रंजन तावरे आहेत. अजित पवारांच्या निलकंठेश्वर पॅनलला केवळ ६ जागा मिळाल्यात. या साखर कारखान्याची सात वर्षानंतर निवडणूक पार पडलीये.

तावरे यांनी निर्विवादपणे कारखान्यावर सत्ता मिळवलीये. होम ग्राऊँडवरील हा पराभव म्हणजे राजकीयदृष्टया अजित पवारांना मोठा धक्का आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.