नगर-सोलापूर मार्गावर भीषण अपघात, सहा जण ठार

अहमदनगर-सोलापूर मार्गावर एका भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यु झाला आहे, तर दोन गंभीर जखमी आहेत. 

Updated: Apr 30, 2015, 06:46 PM IST
नगर-सोलापूर मार्गावर भीषण अपघात, सहा जण ठार title=

अहमदनगर: अहमदनगर-सोलापूर मार्गावर एका भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यु झाला आहे, तर दोन गंभीर जखमी आहेत. 

श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथे हा तवेरा आणि कंटेनर यांच्यात हा अपघात झाला. आज दुपारी हा भीषण अपघात झाला. मृत आणि जखमी पुण्यातील धनकवडी आणि येथील रहिवाशी आहेत. जखमींवर अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

समोरा-समोर झालेली ही धडक एवढी भीषण होती की तवेरा गाडीचा समोरील भाग भुईसपाट झालाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.